भाग ७ : घनकचरा व्यवस्थापन प्रियदर्शिनी कर्वे २० जून २०२१

२१ व्या शतकात आपल्याला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत असले तरीही संकटांच्या फटक्यांची तीव्रता कमी करणे आणि जगातील सर्व माणसांना चांगले आयुष्य जगण्याची समान संधी उपलब्ध करून देणे शक्य आहे. मात्र त्यासाठी आपल्या जगण्यासाठी आणि तगण्यासाठी आवश्यक घटकांकडे आपण वैज्ञानिक तसेच सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. ही गोष्ट सर्वाधिक अधोरेखित करणारा विषय म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. आपण आत्ताप…

भाग १ : विषयप्रवेश प्रियदर्शिनी कर्वे ०२ जुलै २०२०

आपल्या सौरमालेत पृथ्वी हा एकमेव ग्रह जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी अनुकूल आहे. गेल्या साडेचार अब्ज वर्षांत वातावरण, भूपृष्ठ, आणि जीवसृष्टी यांच्या परस्पर संबंधांमधून इथे अनेक घडामोडी घडल्या आहेत. उदा. जीवाणूंमध्ये सौरऊर्जा, कार्बन डायॉक्साइड आणि पाणी वापरून स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याची क्षमता (प्रकाशसंश्लेषण) उत्क्रांत झाल्यामुळे हवेतील कार्बन डायॉक्साइड झपाट्याने वापरला गेला, व वातावरणात ऑक्सिज…

भाग ४ : जलसुरक्षा प्रियदर्शिनी कर्वे ०२ जानेवारी २०२१

एकविसावे शतक हे विविध आपत्तींचे शतक असणार आहे, आणि त्याला तोंड देण्यासाठी आपण आपल्या मूलभूत गरजा भागवणाऱ्या यंत्रणा मजबुतीने उभ्या करायला हव्या. यामध्ये आत्तापर्यंत आपण आरोग्य सुविधा आणि अन्नसुरक्षितता यांचा विचार केला. या लेखात आपण भारतातील पाण्याच्या उपलब्धतेची परिस्थिती आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनांबद्दल चर्चा करूया. भौगोलिक दृष्ट्या भारत पाण्याच्या बाबतीत अत्यंत सुदैवी आहे. भारताच्या आजूब…

भाग २ : आरोग्यसुरक्षा प्रियदर्शिनी कर्वे ०२ ऑगस्ट २०२०

मागच्या लेखात आपण ह्या शतकात मानवी समाजाला कोणत्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यायचे आहे, आणि त्या समस्या आपल्याच इतिहासामधून कशा उद्भवलेल्या आहेत, याचा थोडक्यात उहापोह केला. आपण भटक्या जीवनशैलीकडून शेतीवर आधारित स्थिर जीवनशैलीकडे वळलो तेव्हा जगण्यासाठी आवश्यक गरजा भागवण्यातील अनिश्चितता कमी करण्याची प्रेरणा असावी. पण त्यानंतर संसाधनांच्या पुरवठ्याची सूत्रे ही काही बेरकी आणि ताकदवान लोकांच्या ह…

भाग ६ : ऊर्जा व्यवस्थापन प्रियदर्शिनी कर्वे ०२ मार्च २०२१

आत्तापर्यंतच्या लेखांमध्ये आपण आरोग्य, अन्नसुरक्षा आणि पाणी या विषयांवर ऊहापोह केला आहे. आता आपण माणसांच्या तगण्यासाठी महत्त्वाच्या बनलेल्या ऊर्जेचा विचार करूया. तसे पाहिले तर ऊर्जा ही माणसाची जीवनावश्यक गरज नाही. अग्नीचा शोध लागण्यापूर्वीही माणसांचे समूह होते, आणि त्यांचे जगणेही बऱ्यापैकी सुरळीत चालू होते. आपल्या हाताने लाकडे पेटवणे व या आगीवर नियंत्रण मिळवणे, हा मानवाचा पहिला असा शोध आहे, जे …

भाग ८ : समारोप प्रियदर्शिनी कर्वे १५ जुलै २०२१

गेल्या सात लेखांमधून मी आरोग्य सुविधा, अन्नसुरक्षितता, पाण्याची सार्वत्रिक उपलब्धता, ऊर्जा सुरक्षितता, सांडपाण्याचे व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन अशा आपण निर्माण केलेल्या वेगवेगळ्या व्यवस्थांबद्दल काही विचार मांडले. या सर्व व्यवस्था आपल्याला एक चांगले जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत. जागतिक हवामान बदल आणि इतर पर्यावरणीय समस्यांमुळे एकविसावे शतक सर्वांसाठीच खडतर बनले आहे, पण यातूनच एक अधिक चांगली, न्य…

कोविड-१९, जागतिक वातावरण बदल आणि भविष्याची वाट प्रियदर्शिनी कर्वे ०५ जून २०२०

कोविड-१९ च्या जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी काल अशक्यप्राय वाटणारे निर्णय आज घ्यावे लागले, आणि उघड्या डोळ्यांनी सारे जग आर्थिक मंदीला सामोरं गेलं. या पार्श्वभूमीवर पर्यावरणवादी गटांमध्ये दोन प्रश्नांवर विचार होतो आहे. (१) या जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी टोकाचे व धाडसी निर्णय घेण्याची हिंमत जगभरातील शासनांनी दाखवली, तशीच जागतिक वातावरण बदलाच्या संकटाला तोंड देण्याची हिंमत दाखवली जाईल का? (२) कोव…

भाग ३ : अन्नसुरक्षा प्रियदर्शिनी कर्वे ०२ सप्टेंबर २०२०

मागच्या लेखात आपण भारतापुढील आरोग्याच्या आव्हानाचा थोडा ऊहापोह केला. चांगल्या आरोग्यासाठी माता व बालकांना योग्य पोषण आणि बालपण सरल्यानंतरही सर्वांना वय व शारीरिक गरजेनुसार आवश्यक पोषणमूल्ये मिळणे महत्त्वाचे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने अन्नसुरक्षेची व्याख्या अशी केली आहे – **सर्व लोकांना, सर्व काळ, निरोगी आणि सक्रीय जीवनासाठी आवश्यक असा पुरेसा, सुरक्षित, पोषक, आणि त्यांच्या पसंतीचा आहार सामाजिक दृष्…

भाग ५ : सांडपाणी व्यवस्थापन प्रियदर्शिनी कर्वे ०२ फेब्रुवारी २०२१

मागच्या लेखात आपण स्थानिक पातळीवर उपलब्ध पाण्याचे स्रोत व त्यांच्या नियोजनाची चर्चा केली होती. आपले स्थानिक पातळीवरील पाण्याचे स्रोत आपल्या वापरामुळे आटतात, पण स्थानिक पर्जन्यचक्राच्या माध्यमातून दरवर्षी नव्याने त्यांच्यामध्ये पाणी भरलेही जाते. मात्र पृथ्वीचा एकूण विचार केला तर पाणी हे एक अतिशय मोजक्या प्रमाणात उपलब्ध असलेले मूलभूत संसाधन आहे. पृथ्वीवर नैसर्गिक रित्या घडणाऱ्या कोणत्याही रासायनिक प…